flowers

सलग आठव्या वर्षी गरीब नागरिकांना मोफत धान्य वाटप, कपड्यांची मदत, महाराष्ट्र युवा क्रीडा प्रतिष्ठानचा उपक्रम

 


ठाणे : प्रतिनिधी

महाराष्ट्र युवा क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने "मदत हेच खरे जीवन" हे घोषवाक्य ज्याप्रमाणे आहे, त्याच प्रमाणे प्रतिष्ठांनचे मुख्य कार्य गरीब आणि गरजू नागरिकांना मदत करणे हेच आहे. गरिबांच्या घरात दिपावली निमित्त कंदिलाचा प्रकाश पसरावा , आनंदाचा दिवा लावता यावा, म्हणून मागील सात वर्षापासून प्रतिष्ठान मार्फत गरिब नागरिकांना धान्याची मदत देण्यात येते. यामुळे यावेळी अवनी मतिमंद विद्यालय, मुरबाड आणि जूनावणा पाडा, माहुली गड, शहापूर येथील नागरिकांना धान्याची मदत महाराष्ट्र युवा क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली. यामध्ये तेल, रवा, डाळ, मोती साबण, कपडे धुण्याचा साबण, पाऊडर, नववारी, सावारी साड्या, कपडे, दिपावली फराळ अशी भेट मदत म्हणून देण्यात आली. या उपक्रमाला ठाणे शहर पोलिस , वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संजय शिंदे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल कदम, सुवर्णा भोईर, अक्षय शिंदे, संगीता अलिमकर यांनी मोठ्या प्रमाणात मदत केली.

सलग आठव्या वर्षी महाराष्ट्र युवा क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल कदम यांच्या संकल्पनेतून गरीब नागरिकांना मदत करण्याचे योजिले असून ही मदत प्रत्येक वर्षी सुरूच राहणार असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल कदम यांनी सांगितले. धान्याची मदत दिल्याने अवनी मतिमंद विद्यालय यांनी प्रतिष्ठानला आभार पत्र देऊन आभार मानले, तर जूनावणा पाडा येथील नागरिकांनी देखील मदत दिल्याने प्रतिष्ठाननच्या उपक्रमाचे कौतुक करून शुभ आशीर्वाद उपस्थित सर्व पदाधिकारी यांना दिले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत