मॉरिशस विमानतळावर संजय केळकर आणि चमूचे जंगी स्वागत.
कोमसापचे आंतरराष्ट्रीय मराठी साहित्य संमेलन..
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या १७व्या आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलनासाठी ठाण्यातून निघालेले निमंत्रक तथा आमदार संजय केळकर आणि चमूचे मॉरिशस विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले.
कोमसापचे आंतरराष्ट्रीय हृदयंगम मराठी साहित्य संमेलन संस्थापक अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली मॉरिशसमध्ये २ आणि ३ डिसेंबर रोजी होत आहे. या संमेलनात १०८ प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.
बुधवार २९ नोव्हेंबर रोजी ठाण्यातून संमेलनाचे निमंत्रक संजय केळकर आणि कोमसापचे पदाधिकारी, साहित्यिकांचा चमू मॉरिशसला रवाना झाला. विमानतळावर पोहोचताच तेथील मराठी मंडळ आणि सरकारतर्फे संजय केळकर यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी संमेलनाध्यक्ष विजय कुवळेकर, कवी अशोक नायगावकर, प्रा.प्रदीप ढवळ, अशोक समेळ, नमिता कीर, जयू भाटकर, राजन बने आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment