flowers

सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकास श्री मधू दंडवते टर्मिनस असे नाव द्या - कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाची मागणी

          खासदार विनायक राऊत यांना दिले निवेदन



कोकण वासियांच्या विविध समस्या मार्गी लावल्या जाव्यात यासाठी कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाने पुढाकार घेतला आहे. संघाच्या वतीने या समस्यांबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार विनायकजी राऊत आणि पक्षाचे सचिव आदेश बांदेकर यांना निवेदन देण्यात आले. संजय (भाऊ) दिना पाटील यांनी भांडुप येथे आयोजित केलेल्या कोकणवासियांच्या जाहीर मेळाव्यात ते आले होते. या मेळाव्यात संघाच्या वतीने राऊत आणि बांदेकर यांना शाल - श्रीफळ देऊन देण्यात आला. रविवार २६ नोव्हेंबर रोजी रात्रौ ८:०० वाजता हा मेळावा संपन्न झाला. या मागण्यांचे निवेदन पत्रक देताना संघटनेचे प्रमुख सल्लागार राजू सुदाम कांबळे, खजिनदार संभाजी बाळू ताम्हणकर, सचिव परेश महीपत गुरव, सचिव दर्शन पांडुरंग कासले, उप खजिनदार प्रसन्ना दिनकर फावसकर, सदस्य मंगेश घाडीगांवकर, सदस्य अमित चव्हाण, सदस्य जितेंद्र बाईत आदी उपस्थित होते.

कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाने दिलेल्या निवेदनात पुढील मागण्यांचा उल्लेख करण्यात आला आहे.

👉🏼 सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकास श्री मधू दंडवते टर्मिनस असे नामकरण करणेसंबधी.

👉🏼 सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकात महत्त्वाच्या गाड्यांस थांबे आणि स्थानक सुधारणा करणेसंबंधी. 

👉🏼 मुंबई  - गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण काम मार्गी लावून लवकरात लवकर लोकार्पण करणेसंबधी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत