ठाणे जिल्ह्यातील माजी सैनिक/फॅमिली पेन्शनरांची कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न
ठाणे, दि.23 (जिमाका) :-* PCDA(NAVY) MUMBAI व जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय ठाणे/पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, ठाणे येथे DIGITAL LIFE CERTIFICATE CAMPAIGN 2.0 चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जिल्ह्यातील 105 माजी सैनिक/माजी सैनिक विधवांनी भाग घेऊन आपले जीवन प्रमाणपत्र स्पर्श ला सादर केले.
या विशेष शिबिराकरिता PCDA तर्फे अमित कुमार -ऑडिटर व मोहित साहू - सहाय्यक लेखा अधिकारी हे उपस्थित होते. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर प्रांजळ जाधव (निवृत) यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सुभेदार सुभाष डोंगरे (निवृत) व इतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने ही मोहीम यशस्वी झाली.

Post a Comment