23 नोंव्हंबरला जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्यावतीने काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे 35 हजार कोरोना योद्धा भगिनींसाठी ‘कृतज्ञता भाऊबीज
ठाणे ः जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष निलेश भगवान सांबरे यांच्या संकल्पनेतून गेली 4 वर्षे ठाणे, पालघर, रायगडसह कोकणातील तमाम माता-भगिनींसाठी ‘कृतज्ञता भाऊबीज’ साजरी करण्यात येते. पालघर जिल्ह्यातील जव्हार, विक्रमगड, वाडा, मोखाडा, तलासरी व डहाणु या तालुक्यांत उत्साहात ‘कृतज्ञता भाऊबीज’ संपन्न झाल्यानंतर ठाणे जिल्ह्यातील 35 हजार कोरोना योद्धा भगिनींसाठी ‘कृतज्ञता भाऊबीज’ ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, वसंतविहार, घोडबंदर रोड येथे 23 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 3 ते सायं. 7 या वेळेेत आयोजित करण्यात आली आहे.
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था ही संस्थापक / अध्यक्ष निलेश भगवान सांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली गेली अनेक वर्षे ठाणे - पालघरसह संपूर्ण कोकण पट्टयातील दीन, दलित, मागास, आदिवासी महिला, मुले यांच्या शैक्षणिक, सामाजिक, आरोग्यविषयक उपक्रमांसाठी कार्यरत आहे. विक्रमगडमधील झडपोली येथे संस्थेचे अत्याधुनिक रुग्णालय व सीबीएससी धर्तीवर शाळा सुरू आहे. तसेच युपीएससी/एमपीएससी, पोलीस, मिलिटरी भरतीचे प्रशिक्षणही पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील अत्यंत गरीब, गरजू, वंचित मुलांना मोफत देण्याचे कार्य जिजाऊ संस्था करीत आहे. आदिवासी, डोंगराळ भागातील, गरीब कुूटुंबातील महिला, मुले, मुली नोकरीपासून वंचित राहू नये, त्यांना त्यांचा स्वतःचा रोजगार सुरू करता यावा, यासाठी जिजारऊकडून विविध कोर्सेस मोफत शिकविले जातात. तर ठाण्यात 10 ठिकाणी मोफत अभ्यासिका व संंस्थेचे कार्यालय गरजवंतासाठी सतत उघडे असते. या सामाजिक भावनेतून कोरोना काळातील 35 हजार कोरोना योद्धा महिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 23 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 3 ते 7 या वेळेत डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे निलेश सांबरे, हेमांगीताई पाटील, मोनिकाताई पानवे, धीरज सांबरे आदींच्या उपस्थितीत ‘कृतज्ञता भाऊबीज’ हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ठाणे शहरातील महिला बचत गट, विविध सामाजिक संस्था, संघटना कोरोना काळात कठीण परिस्थितीत कुटुंबाला आधार देणार्या 35 हजार कोरोना योद्धा महिलांचा सन्मान यावेळी करण्यात येणार आहे.

Post a Comment