flowers

सोनल जेट्टी हिला थायलंड कप आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत 2 सुवर्णपदके

 


ठाणे : थायलंड येथे पार पडलेल्या थायलंड कप आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत ठाण्याची सोनल जेट्टी या विद्यार्थिनीने 2 सुवर्णपदके मिळवली. तसेच तिने व्हाईट बेल्ट ते ब्लॅक बेल्ट या आतापर्यंतच्या प्रवासात 7 सुवर्णपदके, 6 रौप्यपदके व 4 कांस्यपदके व नुकतीच मिळालेली 2 सुवर्णपदके अशी 19 पदके आणि 3 ट्रॉफी मिळवली आहेत.
थायलंड कप आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धा रविवार, 5 नोव्हेंबर 2033 रोजी थायलंड येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे मुख्य संयोजक हंशी डॉ. टेननीथ हे होते. थायलंड, भारत, मलेशिया, युएई आणि श्रीलंका या पांच देशांतून सुमारे 250 स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. अल्टीमेट मिक्स्ड मार्शल आर्टस् असोसिएशन या संस्थेकडून ठाण्यातून झहीर सर आणि सलीम सर यांच्या चार विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. ज.ए.इ.च्या मो. ह. विद्यालय, ठाणे या शाळेतील इ. 8 वी अ मध्ये शिकत असलेली सोनल जेट्टी या विद्यार्थिनीने शुडोकॉन व बुडोकॉन या खेळाच्या प्रकारामध्ये काथा प्रकारात 32.6 गुण व फाईट प्रकारात 6 गुण मिळवून दोन सुवर्णपदक पटकावली. फाईटमध्ये तिची प्रतिस्पर्धी हरियाणाची होती.  
सोनल जेट्टी हिच्या या यशात तिचे पालक तसेच प्रशिक्षक श्री. झहीर सर, श्री. सलीम सर आणि मो. ह. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. निलांबरी जठार यांचा मोलाचा सहभाग आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत