flowers

टेंभी नाका येथे असंख्य महिलांच्या उपस्थितीत रश्मीताई ठाकरे यांनी घेतले दुर्गामातेचे दर्शन

 


प्रतिनिधी -धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनी जय अंबे मॉ सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्थेच्या माध्यमातून सुरू केलेल्या आणि महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या टेंभी नाक्यावरील देवीचे दर्शनासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी सौ.रश्मीताई ठाकरे यांनी असंख्य महिलांसह उपस्थितीत राहिल्या होत्या त्यांनी सर्वप्रथम धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून देवीचे दर्शन घेऊन महाआरती त्यांच्या हस्ते संपन्न झाली 

त्यावेळी  शिवसेना नेते खासदार राजन विचारे, शिवसेना उपनेत्या विशाखा राऊत, माजी महापौर किशोरी पेडणेकर, महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर, समिधा मोहिते, माझी नगरसेविका नंदिनी राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे, द्वारकानाथ भोईर, विठ्ठल मोरे, प्रभाकर म्हात्रे व उपजिल्हाप्रमुख, शहरप्रमुख, व इतर शिवसेना पदाधिकारी महिला मोठ्या संख्येने उपस्थित  होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत