Folowers

कल्याण लोकसभा मतदासंघाच्या ग्रामीण भागाच्या विकासासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर- खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश

 

 

कल्याण - कल्याण लोकसभा मतदारसंघातील शहरी भागात मूलभूत सोयी सुविधा उभारण्यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पुराव्यामुळे विविध मूलभूत सोयी सुविधा उभ्या राहिल्या आहेत. याच बरोबर आता मतदारसंघातील ग्रामीण भागात विविध पायाभूत सुविधा उभारणीसाठी शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागातर्फे दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या अंतर्गत रस्ते उभारणीरस्त्यांचे काँक्रीटीकरण स्मशानभूमी बांधणेदशक्रिया विधी घाट सुशोभीकरणबंदिस्त गटारेनालासमाजमंदिर बांधणे यांसारखी विविध कामे मार्गी लागणार आहे.

 

 

कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून मतदारसंघात विविध पायाभूत सुविधा उभारणीचे प्रकल्प मार्गी लागले आहेत. या पायाभूत सुविधांच्या उभारणी बरोबरच संयुक्त  घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पशिव मंदिर परिसर सुशोभीकरण प्रकल्पखिडकाळी मंदिर परिसर सुशोभीकरण प्रकल्पमहाहब याच बरोबर मतदारसंघातील विविध रेल्वे स्थानकांमध्येही अनेक सोयी सुविधा उभारण्यात आल्या आहे. याच पद्धतीने मतदासंघातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी देखील खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून आजवर मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करण्यात आली आहे. राज्याच्या ग्राम विकास विभागाकडून यासाठी नुकताच १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे सातत्याने पाठपुरावा करत होते. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून  ग्रामीण भागाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी मानूर करण्यात आला आहे. या निधीच्या माध्यमातून रस्ते उभारणीस्मशानभूमी बांधणेदशक्रिया विधी घाट सुशोभीकरणबंदिस्त गटारेनालासमाजमंदिर बांधणे यांसारखी कामे या अंतर्गत करण्यात आली आहे. कल्याण तसेच अंबरनाथ तालुक्यात या कामांची उभारणी करण्यात येणार आहे. यामुळे मतदारसंघातील शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागाचा देखील चेहरामोहरा पालटणार आहे.

 


ग्रामीण भागाच्या विकासासाठी १० कोटी रुपयांच्या निधी मंजूर करण्यात आला आहे. याचबरोबर अंबरनाथ तालुक्यातील हाजीमलंग गडाच्या पायथ्याशी मौजे कुंभार्ली या पुरातन मंदिर परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. यासाठी ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून १ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. मंदिर परिसराच्या सुशोभीकरणानंतर या मंदिर परिसराला एक नवी झळाळी प्राप्त होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत