राज्य उत्पादन शुल्क कोकण विभाग भरारी पथकाची कारवाई,५५ लाखाचा मुद्देमाल जप्त
ठाणे दि: राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक, कोकण विभाग, ठाणे, यांची कारवाई ध्वानी कॉम्पलेक्स, शॉप नं. २०४, २०५ व २०६, वाडा रोड, अनगाव, ता. भिवंडी, जि. ठाणे. येथे बेकायदेशीररित्या परदेशातील वाईनचा साठा एकूण रु. पंचावन्न लाख बावीस हजार चारशे रुपयांचा
मुद्देमाल जप्त दि. १०/१०/२०२३ रोजी मा. श्री. डॉ. विजय सुर्यवंशी, सोो., आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क,
महाराष्ट्र राज्य मुंबई, मा. श्री. सुनिल चव्हाण, सह आयुक्त (प्रशासन) महाराष्ट्र राज्य, मुंबई, मा. श्री. प्रसाद सुवें सोो., विभागीय उपआयुक्त, रा.ऊ.शु कोकण विभाग, ठाणे व मा. श्री निलेश सांगडे,अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, ठाणे यांनी परदेशातील अवैध मद्याविरुध्द कारवाई करण्यासाठी दिलेल्या
निर्देशांच्या अनुषंगाने ध्वानी कॉम्पलेक्स, शॉप नं. २०४, २०५ व २०६, वाडा रोड, अनगाव, ता. भिवंडी, जि. ठाणे येथे परदेशातील वाईनचा अवैध साठा करुन ठेवला आहे. अशी माहिती मिळाल्यावरुन निरीक्षक श्री. दिगंबर शेवाळे यांच्या समवेत व मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक, एस. जे. जरांडे व त्यांच्या सहकारी स्टाफने खाजगी वाहनाने ध्वानी कॉम्पलेक्स, शॉप नं. २०४, २०५ व २०६, वाडा रोड, अनगाव, ता. भिवंडी, जि. ठाणे. येथे जावून छापा मारला असता सदर ठिकाणी मोठया प्रमाणात परदेशातील वाईनच्या ७५० मिलीच्या ५२८८ बाटल्या आढळून आल्याने १) रमेंद्रकुमार रमाकांत तिवारी, वय ४८ वर्षे, रा. रुम नं. ३, विलास शेठ चाळ, किसन चौक, गणेश नगर, शेलारगाव, ता. भिवंडी, जि. ठाणे. व २) रियाज अली आबिद वय ५५ वर्षे, रा. म्हाडा कॉलनी, नंदीनाका, भिवंडी, ता. भिवंडी, जि. ठाणे, यांना अटक करुन परदेशातील वाईनच्या ७५० मिलीच्या एकुण ५२८८ बाटल्यांसह रुपये ५५,२२,४००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
सदर कारवाई दुय्यम निरीक्षक, श्री. संदीप जरांडे व दुय्यम निरीक्षक श्री विजय धुमाळ तसेच जवान हनुमंत गाढवे, नारायण जानकर, केतन वझे, संपत वनवे, नानासाहेब शिरसाठ, विजय पाटील, सागर चौधरी - (जवान नि-वाहन चालक) यांनी पार पाडली. दुय्यम निरीक्षक, श्री. संदीप जरांडे, हे पुढील तपास
करत आहेत.

Post a Comment