flowers

राहुल पिंगळे यांची काँग्रेसच्या ठाणे शहर जिल्हाध्यक्षपदी निवड


ठाणे:ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या वतीने राहुल पिंगळे यांची ठाणे शहर जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आज त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. 

संघटनेत अनुभवी चेहरा

राहुल पिंगळे हे गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षात सक्रिय आहेत. NSUI, युवक काँग्रेसपासून त्यांनी संघटनात्मक कामाला सुरुवात केली. शहरातील प्रश्नांची जाण आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी असलेला थेट संपर्क यामुळे त्यांची निवड पक्षवाढीसाठी निर्णायक ठरेल, असा विश्वास वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केला आहे.

पुढील आव्हाने

ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंगळे यांच्यासमोरील आव्हाने मोठी आहेत. शहरातील प्रभाग रचना, बूथ कमिट्या मजबूत करणे, गटबाजी संपवून सर्वांना एकत्र आणणे आणि काँग्रेसचा जनाधार वाढवणे ही त्यांची प्राथमिकता असेल.

निवडीनंतर राहुल पिंगळे म्हणाले, "पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवेन. ठाण्यात काँग्रेस पुन्हा एकदा क्रमांक एकचा पक्ष बनवण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करेन. राहुल गांधी यांच्या विचारांवर ठाम राहून सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी लढा देऊ."




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत